सेंट जाॅर्ज : टी-२० विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या तयारीत असलेल्या वेस्ट इंडिजने अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होला संघात स्थान दिले आहे. दोन वेळा टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या ब्राव्होला आगामी आयर्लंडविरूध्दच्या तीन टी-२० क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी १३ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे.
🚨SQUAD ANNOUNCEMENT🚨 – DWAYNE BRAVO BACK IN WEST INDIES COLOURS TO FACE IRELAND IN THE T20I SERIES! #WIvIRE #MenInMaroon pic.twitter.com/krvHXKCMfR
— Windies Cricket (@windiescricket) January 12, 2020
आयर्लंडविरूध्दच्या मालिकेसाठी नियमित कर्णधार जेसन होल्डर याला विश्रांती देण्यात आली असून कायरन पोलार्डकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. आयर्लंडविरूध्द विंडीज असे तीन टी-२० सामने १५, १८ आणि १९ जानेवारी रोजी खेळविण्यात येणार आहेत.
ब्रावोने याआधी विंडीजकडून २०१६ सप्टेंबरमध्ये पाकविरूध्द टी -२० सामना खेळला होता. ज्यानंतर फ्रेंचाइजी क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी त्याने निवृत्ती घेतली होती.
वेस्टइंडिज संघ : कायरन पोलार्ड (कर्णधार), ड्वेन ब्रावो, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमायर, ब्रेंडन किंग, एविन लुईस, खैरी पियरे, निकोलस पूरण, रोवमैन पावेल, शेरफाइन रदरफोर्ड, लेंडल सिमंस, हेडन वाल्श आणि केसरिक विलयम्स.