काश्‍मीरमध्ये हिज्बुलच्या तीन दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर -हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना काश्‍मीरमध्ये अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना श्रीनगरमध्ये पकडले. रशिद लतिफ मिर, असिफ इक्‍बाल दार आणि शाहीद हसन दार अशी अटक झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. ते अलिकडेच हिज्बुलमध्ये सामील झाले.

मात्र, त्यांनी एकापाठोपाठ एक दहशतवादी कारवाया घडवल्या. त्यात गोळीबार आणि ग्रेनेड डागण्याच्या घटनांचा समावेश आहे. ते प्रामुख्याने श्रीनगर आणि जम्मूू शहरांमध्ये सक्रिय होते. हिज्बुलचा म्होरक्‍या जुनैद याच्या निर्देशावरून ते सक्रिय होते. त्यांची अटक हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. मागील काही काळापासून सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात धडक मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा हादरा बसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)