मार्केटयार्डात तीन फुटी भोपळा दाखल

चार किलो वजन : किलोस 10 रुपये भाव


वाई तालुक्‍यातील गुळूम येथून आवक

पुणे – तीन फूट लांबीच्या, तब्बल चार किलो वजनाच्या भोपळ्याची मार्केटयार्डात रविवारी आवक झाली. इतक्‍या मोठ्या भोपळ्याची पहिल्यांदाच येथे आवक झाली. या भोपळ्यास घाऊक बाजारात किलोस 10 रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी किरण कटके यांनी दिली. दरम्यान, नियमित आकारातील लहान भोपळ्याची 8 ते 10 टेम्पो आवक झाली. या भोपळ्याला किलोस दर्जानुसार 10 ते 20 रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी निखिल भुजबळ यांनी दिली.

मोठ्या आकाराच्या भोपळ्याची वाई तालुक्‍यातील गुळूम या गावातून आवक झाली. प्रताप यादव या शेतकऱ्यांनी विशिष्ट प्रकारच्या वाणाची लागवड करून याचे उत्पादन घेतले आहे. प्रयोग म्हणून विक्रीसाठी हा भोपळा पुण्यात पाठविला. त्याच्या आकार, उंचीनुसार भाव ठरतात.

कमी उंचीच्या भोपळ्याला अधिक भाव तर, जादा उंचीच्या भोपळ्याला कमी भाव मिळतात. रविवारी 50 ते 60 किलो भोपळ्याची आवक झाली. हॉटेल व्यावसायिक, खानावळवाल्यांनी याची खरेदी केल्याचे कटके यांनी सांगितले. नेहमीच्या दुधी भोपळ्याची किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केल्याचे भुजबळ यांनी नमुद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.