अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

पुणे  – लग्नाच्या अमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी आणि 3 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त चार महिने कारावसा भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

अक्षय अशोक लोणारे (वय 21, रा. कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ही घटना 18 जून 2015 आणि त्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदर घडली. पंधरा वर्षीय पीडित मुलीच्या आईने याबाबत कोंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले.

त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कोंढवा पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल अंकुश केंगळे, संतोष अंगणे यांनी मदत केली. लग्नाच्या अमिषाने लोणारे याने पीडितेला पळवून नेले. दुसऱ्या दिवशी ते दोघे मिळून आले. त्यानंतर केलेल्या तपासात त्याने पळवून नेण्याच्या चार ते पाच दिवस अगोदर तिच्यावर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.