वाघोली – येथील आरव कन्स्ट्रक्शन बांधकाम साईटवरील 150 किलो लोखंडाची चोरी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
यावेळी लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने चोरलेले लोखंड व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
याप्रकरणी उषा लावरीश काळे (वय 35), गणेश काका भोसले (वय 35), सुमन गणेश भोसले (वय 34, तिघेही रा. न्हावी सांडस) यांना पोलिसांनी अटक केली आहे.