पिंपरी -आगामी काळातही पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ठिकाणी सुद्धा शहरातील नागरिक भारतीय जनता पार्टीचीच सत्तापक्ष म्हणून निवड करणार आहेत. याची चाहूल लागल्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना भाजपवर खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्ही शहरात 2017 पासून विविध विकास कामे केलेली आहेत. पाच वर्षात झालेल्या महासभांमध्ये विरोधक मूग गिळून गप्प बसले होते, आता नऊ विषय घेवून न झालेल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा त्यांना कसलाही नैतिक अधिकार नाही. अशी टीका सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व कॉंग्रेस पक्षाच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये जनतेची महासभा घेण्यात आली. याबाबत विचारले असता ढाके बोलत होते. ते म्हणाले, या पाच वर्षाच्या काळामध्ये भाजपाने शहरातील गरजा ओळखून पुढील 30 वर्षाचे नियोजन केले आहे. विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. आता राष्ट्रवादीकडे नागरिकांसमोर जाण्यासाठी कसलेही ठोस मुद्दे नाहीत. त्यामुळे येणारी निवडणूक