मुंबई – भारतीयच नव्हे तर जागतिक क्रीडारसिकांना यंदा विविध मानाच्या स्पर्धांची रंगत घेण्याची पर्वणी मिळणार आहे. 2020 मध्ये जागतिक स्तरावर सर्वात प्रतिष्ठेची ऑलिम्पिक स्पर्धा तर होत आहेच मात्र त्याचबरोबर 19 वर्षांखालील विश्वकरंडक, महिलांचा टी-20 विश्वकरंडक, पुरुषांचा टी-20 विश्वकरंडक अशा स्पर्धा होत आहेत. हा योग प्रथमच जुळून आला आहे.
भारतीय क्रीडा रसिकांबाबत बोलायचे झाले तर येत्या रविवार 5 जानेवारीपासून भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळविली जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जात आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात भारतीय संघ 7 टी-20 व 3 एकदिवसीय असे 10 सामने खेळत आहे.