पुणे – आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्ताने “फकीरा पुरस्कार” वितरण समारंभ येत्या २७ ऑगस्ट रोजी सायं. ५ वा.सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ, लोहिया नगर, पुणे या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे.
याप्रसंगी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी सिने अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना फकीरा पुरस्कार, यशवंत नडगम यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, प्रतिभा नारी परिवर्तन संस्था यांना सामाजिक कार्याबद्दल गौरव समाज भूषण पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश बागवे गृहमंत्री हे असणार असून या कार्यक्रमाला आमदार सुनील कांबळे, संजय काकडे, दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ भगवानराव वैराट, मुरलीधर मोहोळ, पुणे शहर जिल्हा मातंग समाजचे सचिव-दयानंद अडागळे व स्वागताध्यक्ष- पंढरीनाथ अढाळगे असे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.