Narendra Modi – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या हस्ते आज 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर पंतप्रधानांचा भव्य रोड शो पार पडला. युवा महोत्सवादम्यान नाशिकच्या पवित्र भूमीतून पंतप्रधान मोदींनी देशातील तरुणांना महत्त्वाचा आणि मोठा सल्ला दिला.
तसंच त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीचाच एक भाग असलेल्या राम कुंडावर जलपूजन केलं. गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसंच नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या काळा राम मंदिरात स्वच्छता मोहीम राबवली. काळा राम मंदिरात पूजा, आरती करण्याआधी त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. हातात झाडू घेऊन त्यांनी स्वतः स्वच्छता केली. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. नेटकरी देखील यावर कमेंट आणि लाईक्स करत आपली प्रतिक्रिया देत आहेत.