मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्काबरोबरचे विवाह सोहळ्यातील एक कृष्णधवल (ब्लॅकव्हाईट) छायाचित्र ट्वीटरवर शेअर केले आहे. त्याला कारणही तसेच आहे. आज दि. 12 डिसेंबर हा विरुष्काच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे.
शिवाय आगामी महिन्यात यांच्या संसारवेलीवर फूलही उमलणार असून, नव्या बाळाच्या स्वागताचा क्षण काळजाच्या कुपीत जपून ठेवण्यासाठी विराट कोहलीने ऑस्ट्रेइया दौऱ्यातून माघारी येण्याचे ठरवले आहे. त्याची पितृत्त्वाची रजा (पॅटर्निटी लीव्ह) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंजूर केली असून पहिली कसोटी संपल्यानंतर साधारण 22 डिसेंबरच्या दरम्यान विराट भारतात परतणार आहे.
वेडींग ऍनिव्हर्सरीच्या फोटो ट्वीटसमवेत विराटने म्हटले आहे की, तीन वर्षे झालेले हे बंधान कायमस्वरुपीचे आहे. या फोटोमध्ये शादी का जोडा परिधान केलेली हस्तमुख अनुष्का विराटकडे कौतुकाने पाहताना दिसते आहे.
3 years and onto a lifetime together ❤️ pic.twitter.com/a30gdU87vS
— Virat Kohli (@imVkohli) December 11, 2020
कसोटी क्रिकेटमध्ये 86 सामन्यांत 27 शतकांसह 7240 धावा आणि 251 एकदिवसीय सामन्यांत 43 शतकांसह 12,040 धावा केलेला विराट कोहली सध्याचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. तर “रब ने बना दी जोडी’, “दिल धडकने दो,’ “जब तक हैं जान’ आणि “पीके’सह अनेक चित्रपटांत सिनेरसिकांच्या पसंतीस उतरलेली अनुष्का शर्मा या सेलेब पेअरने याच दिवशी तीन वर्षांपूर्वी विवाहनंधनात एकमेकांना बांधून घेतले. आता प्रतिक्षा आहे ती “गोड बातमीची…’