साईडपट्ट्या नसल्याने एसटी खचली

मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मंचरमार्गे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याला साईडपट्ट्या नसल्यामुळे भीमाशंकर-पुणे ही एसटी रस्ता सोडून शासकीय भक्तनिवास तळेघर-निगडाळे नजीक घसरली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या साईडपट्ट्या सुस्थितीत कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर ते श्रीक्षेत्र भीमाशंकर रस्त्यावर साईडपट्ट्या राहिल्या नसल्याने पावसाळ्यात वाहने खचून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. श्रावण महिना सुरू होण्याअगोदर रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. श्रावण महिना सुरू होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी राहिला आहे. श्रावण महिन्याच्या पूर्व तयारीत मात्र रस्त्यांची दुरुस्ती फारशी झालेली दिसत नाहीत. सद्यःस्थितीत पाऊस सुरू असल्याने वाहने एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत रस्त्याच्या कडेने वाहने घेण्याचा प्रयत्न करतात. रस्त्याचा अंदाज न आल्याने फसगत होऊन वाहने खचण्याचे प्रमाण वाढले आहे. निगडाळे-तळेघर येथील शासकीय भक्‍त निवासाजवळ शिवाजीनगर आगाराच्या एसटीचा (एमएच 14, बीटी 4249) रस्त्यावर साईडपट्ट्या नसल्याने खचून अपघात झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.