फलटण -आसू ता. फलटण येथे जिल्हा बॅंकेचे संचालक आणि फलटण पंचायत समितीचे सभापती शिवरुपराजे खर्डेकर यांच्या बंगल्यातील कपाटातून रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असा 15 लाखांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद शिवरुपराजे यशवंतराव निंबाळकर यांनी दिली आहे. या फिर्यादीनुसार शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी जास्त पैशाची गरज आल्याने आसू येथील घरातील बेडरुमचे आतील बाजूस असणाऱ्या खोलीतील लोखंडी कपाटात दि. 6 जुलै रोजी सात लाख रुपये रक्कम ठेवली होती. त्यानंतर दि. 12 जुलै रोजी कपाट उघडून पाहिले असता ही सात लाख रुपयांची रक्कम मला दिसली नाही.
तसेच त्यानंतर दि 29 जुलै रोजी आमच्या सूनबाई संयुक्ता यांनी मला सांगितले की, त्यांच्या बेडरुमच्या आतील बाजूस असणाऱ्या लोखंडी कपाटात त्यांनी त्यांचे ठेवलेले पाच लाख रुपये किमतीचा 18 कॅरेट सोन्यामध्ये व डायमंडमध्ये तयार केलेला सोन्याचा नेकलेस, एक लाख20 हजार रुपयांची एक सोन्याची चार तोळे वजनाची लहान लहान मणी असणारी साखळी असा ऐवज दि. 6 ते 11 जुलै दरम्यान अज्ञात व्यक्तीने चावीने कपाट उघडून आतील रक्कम चोरुन ते कपाट पुन्हा चावीने परत बंद केल, अशी तक्रार त्यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक नितिन सावंत तपास करीत आहेत.