पुणे – नेव्हीतील कॅप्टनकडून एका खासगी कंपनीतील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात बलात्कार आणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 28 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनूसार आशितोष राकेश शर्मा (29,रा. हरियारणा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तक्रारदार तरुणी एका खासगी कंपनीत एच आर म्हणून काम करते. तीचे वडिल सरंक्षण खात्यात कार्यरत आहेत. त्यांनी डिफेन्स मेट्रोमोनिअल साईटवर तीचे प्रोफाईल विवाहासाठी टाकले होते. यातून तीची आशितोष बरोबर ओळख झाली. यानंरत त्यांनी घरच्यांच्या संमतीने साखरपुडा केला. साखरपुडा झाल्यावर आशितोषने तीला भेटण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून शारीरीक संबंध ठेवले.
लग्नाचा विषय आल्यावर त्याने आपल्याला थाटामाटात विवाह करायचा आहे. यासाठी तुझे एलआयसी आणी पीएफचे पैसे काढून दे अशी मागणी केली. याला तीने नकार दिल्यावर तीला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. यानंतर तीला तीचे पर्सनल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत मानसिक व शारीरीक छळ केला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी करत आहेत.