मुज्जफरनगर – प्रभावशाली शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्ष या पक्षाच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहींर केला आहे.
पश्चिमी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्ष ही आघाडी राजकीय दृष्ट्या मजबूत मानली जात आहे. त्यातच राकेश टिकैत यांनी याच आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे वजन आणखीनच वाढले असून या पट्ट्यातील जागा टिकवणे हे भाजपसाठी आता मोठेच आव्हान ठरणार आहे.
राकेश टिकैत यांनी सिसोली येथील एका कार्यक्रमात आपली ही घोषणा केली आहे. या पट्ट्यातील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय लोकदल पक्षाला मोठेच समर्थन आहे. या पक्षाशी आघाडी करून समाजवादी पक्षाने मोठीच बाजी मारली आहे असे मानले जात आहे.