वॉशिंग्टन – कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच करोना संपेल, अशी व्यक्त करतानाच करोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचे वॉशिंग्टनमधील विषाणूशास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद यांनी एएनआयशी बोलताना स्पष्ट केले. करोनाच काय कोणताही साथीचा आजार कायमस्वरूपी रहात नाही आणि त्यामुळे करोनाही संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा विषाणू लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असे मला वाटते. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तसतसें आपण लवकरच साथीतून बाहेर येऊ, असे डॉ. कुतुब म्हणाले. विषाणूवर उत्परिवर्तित होण्यासाठी आणि मानवातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील. हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. विषाणू आणि मानव यांच्यात हे एक साधर्म्य आहे, असं मी म्हणेन, असे डॉ. कुतुब यांनी सांगितले. भारताने वर्षभरात तब्बल 60 टक्के लसीकरणाचे ध्येय गाठणे हे कौतुकास्पद आहे देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी घटना आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. आणि गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना भारतीय जागतिक आरोग्य संघटनांमार्फत मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यानंतर आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आणि 12 महिन्यांत आपण जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य केले आहे, ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे, असे ते म्हणाले.