मुंबई – मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे असं योगगुरु रामदेव बाबानी म्हटलं आहे.
तुम्ही मोदी भक्त आहात असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते पुढे म्हणाले, ‘मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. ‘
दरम्यान, कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी सध्या जगभरात लस शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. अनेक देशांनी कोरोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावाही केला होता. यातच काही चार महिन्यांपूर्वी योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावरील ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध लॉन्च केले होते. चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून अंदाजे २४१ कोटी कमवले आहेत.