तळेगाव ढमढेरे – येथील शिक्षण प्रसारक मंडळ गोरगरीब व तळागाळातील विविध घटकांसाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. संस्थेच्या शैक्षणिक संकुलास पटोले यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री मोहमद आरिफ नसीम खान, ज्येष्ठ नेते देविदास भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव निखिल कवीश्वर, सचिन साठे, बारामती लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य अमित मेश्राम, जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अवधुत मते, खडकवासला विधानसभा अध्यक्ष किशोर रायकर,
जिल्हा सरचिटणीस आबा जगताप, शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, प्रदीप मेहेकरे, नगरसेविका संगीता मल्लाव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संस्थेचे मानद सचिव अरविंद ढमढेरे, शिरूर महिला कॉंग्रेस अध्यक्षा प्रियांका बंडगर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमजद पठाण, शिरूर किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात, शिरूर तालुका उपाध्यक्ष सचिन पंडित, शंतनू मल्लाव, संतोष शिंदे, अशोक भुजबळ उपस्थित होते.