वॉशिंग्टन – भगवान जब भी देता है तो छप्पर फाड के देता ही म्हण खरी असल्याचा अनुभव अमेरिकेतील एका सर्वसामान्य महिलेला आला रेस्टॉरंटमध्ये ही महिला डिनरला गेली असताना तिला तिच्या डिनरमध्ये तब्बल बारा मोती सापडले आणि क्षणात ती मालामाल झाली तिने डिनरमध्ये समुद्री अन्न मागवले होते त्या अन्नमध्ये बारा मोती आढळले केली
हिल असे या महिलेचे नाव असून न्यू ओरलीयन्समधील सुपेरिया सी फूड रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी गेली असतात ही घटना घडली नर्सरी टीचर म्हणून काम करणाऱ्या केलीने ऑईस्टरची ऑर्डर दिली होती या ऑईस्टरचा आस्वाद घेत असताना तिच्या दाताखाली काहीतरी आले हे पाहिले असता तो मोती असल्याचे तिच्या लक्षात आले
त्याच्यानंतर इतर ऑईस्टर तपासले असता बारा मोती सापडले रेस्टॉरंट मध्ये मुख्य शेफ म्हणून काम करणारा गेलेट जॉर्डन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दररोज त्याच्या हाताखालून 2500 पेक्षा जास्त ऑईस्टर जातात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात मोती क्वचित सापडतात
अडीच-तीन हजार ऑईस्टर सोलल्यानंतर एखाद-दुसरा मोती मिळू शकतो पण एकाच व्यक्तीच्या ऑर्डर मध्ये इतके मोती मिळणे दुर्लभ असल्याची माहिती त्यांनी दिली या पूर्वी मार्च महिन्यामध्ये ही एका महिलेच्या डिनर मध्ये एक गुलाबी रंगाचा मोती सापडला होता त्याची किंमत बाजारात दहा हजार पाउंड एवढी होती केलीच्या डिनरमध्ये सापडलेल्या मोत्यांची किंमत किती असेल हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही तरी तिचा चांगलाच आर्थिक फायदा झाल्याची चर्चा रंगली आहे