मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत आहे. यावेळी नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असून मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करणार आहेत. गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 च्या विस्तारित मार्गिकांचे लोकार्पण होणार आहे.
अशातच पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आली आहे. यामळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी कितीवेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा प्रश्नही विद्यार्थी संघटनाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
भूमीपूजन आणि लोकार्पण या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्यांसाठी पार्कींगची सुविधा व्हावी, यासाठी मुंबई विद्यापाठीच्या कलिना कॅम्पसची भिंत तोडण्यात आल्याने विविध विद्यार्थांंनी आक्षेप घेतला आहे. राजकीय कार्यक्रमांसाठी आणखी किती वेळा कॅम्पसमधील भिंती तोडणार? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी महापालिकेला विचारला आहे.
“युनिव्हर्सिटीला” “पार्किंग सिटी” करताय का ? मुलींच्या वस्तीगृहाच्या समोर भिंत पाडून रस्ता बनवला… मुलींची व विद्यार्थ्यांची सुरक्षाता धोक्यात.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, एडवोकेट अमोल मातेले यांची प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई “युनिव्हर्सिटीला” “पार्किंग सिटी” करताय का ?
मुलींच्या वस्तीगृहाच्या समोर भिंत पाडून रस्ता बनवला…
मुलींची व विद्यार्थ्यांची सुरक्षाता धोक्यात.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते, एडवोकेट अमोल मातेले यांची प्रतिक्रिया…@MumbaiUni @educlashco pic.twitter.com/iQu9jA8WjL— Adv.Amol Matele ॲड.अमोल मातेले (@AdvAmolMatele) January 18, 2023