वाडिया पार्कमधील अनधिकृत इमारत जमीनदोस्त

नगर – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अखेर वाडिया पार्क परिसरातील अनधिकृत बांधण्यात आलेल्या (बी) इमारतीवर शनिवार (दि.15) रोजी सकाळी बुलडोझर फिरवत जमिनदोस्त केली. त्यामुळे या कारवाईचे सर्वत्रच स्वागत होत आहे.

याबाबत माहिती अशी की, तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी एका ठेकेदाराला दिली. मात्र, त्या ठेकेदाराने मंजुरी पेक्षा जास्त बांधकाम केले. क्रीडा संकुल समितीच्या पार्कींगच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याबाबत 2013 रोजी न्यायालयाने हे अनधिकृत गाळे पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवार (दि.8) रोजी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात या गाळ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली. मात्र, त्या कारवाईला ठेकेदाराने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अक्षेप घेवून ते अतिक्रमण कारवाई थांबविली. परंतु आज शनिवार (दि.15) रोजी सकाळी पुन्हा जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमण पाडण्याचे आदेश मनपाच्या अतिक्रमण विभागालादेवून त्यांनी ती इमारत जमिनदोस्त केली.

क्रीडा संकुलनात “ए’ इमारत, एम. आर. ट्रेड सेंटर (बी’ इमारत) पार्किंगच्या जागेत बांधले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दीड वर्षापूर्वी महापालिकेचा प्रभारी आयुक्‍त पदभार होता. त्या वेळी द्विवेदी यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली होती. या भेटीत जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्‍त बांधकामाचा विषयही निघाला होता. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी व जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्याशी चर्चाही केली होती. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशावरून शनिवार (दि.15) सकाळी कारवाई करण्यात आली. तत्कालीन नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलनासाठी हस्तांतरीत केली होती.

या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी जवाहार मुथ्था या ठेकेदाराला दिली होती. मात्र, त्याठेकेदाराने मंजुरी पेक्षा जास्त बांधकाम केले. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग हे सेवानिवृत्त झाल्याने मनपाचा प्रभारी पदभार हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे येताच त्यांनी वाडिया पार्क मधील अनाधिकृत गाळ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख सुरेश इथापे यांनी कारवाईचे नियोजन करून, तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी, 30 कर्मचारी, 4 होमगार्ड यांचा बंदोबस्तात कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.