नवी दिल्ली – वन्य श्वापदांच्या जीव वाचवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालण्याच्या घटणा प्रेरणादायी असतात. असाच एक व्हिडिओ गीर राष्ट्रीय अभयारण्यात पहायला मिळत आहे. जाळ्यात अडकलेल्या वाघाच्या बछड्याला वाचवतानाचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला नेटीझन्सनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
भारतीय वन सेवेतील (आयएफएस) अधिकारी रमेश पांडे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. गीरमध्ये वाघाचा बछडा जाळ्यात अडकल्याचा फोन वनाधिकाऱ्यांना आणि संशोधकांना येतो. एका मोकळ्या जागेत लावलेल्या नेट मध्ये वाघाचा बछडा अडकल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्याला जाळ्यातून सोडवण्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. अखेर त्या बछड्याची जाळ्यातून सुटका होते.
त्याच्या जवळ अन्य बछड्यांना घेऊन वाघीण बसलेली असते. या क्लिपसोबत पांडे यांनी कॅप्शन लिहली आहे, बछड्याचा गळा आवळून मृत्यू होणे टाळण्यासाठी त्यांनी आपला जीव पणाला लावला. आणि बछड्याला मोकळे केले. वनसंरक्षकांना सलाम.
चार मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला सुमरे तीन हजार लाईक्स आणि शेकडो कमेंट मिळाल्या आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनीही या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
त्यांनी स्वत:ला अक्षरश: धोक्यात टाकले… त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यालाच हवी, असे एका एकाने ट्विटरवर लिहले आहे. शूर पुरषांनो, खूप आभार असे एकाने म्हटले आहे. सुंदर! आशा आहे ते या जाळ्यातून सुटतील, अशी कमेंटही एकाने लिहली आहे.