निवेदन मिळताच दहाव्या मिनिटात टॅंकर सुरू

मुख्यधिकाऱ्यांची तत्परता : सायली हिल परिसर हिरवळला

बारामती- शहरातील सायली हिल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे. वृक्षांना पाण्याची गरज असल्याचे निवेदन येथील मंगेश नाना ओमासे मित्र मंडळाच्या वतीने मुख्याधिकारी यांना देण्यात आले. निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी अवघ्या दहा मिनिटांत सायली हिल परिसरात कायमस्वरूपी पाण्याच्या टॅंकरची सोय केली. मंडळाच्या कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले. सायली हिलप्रमाणे इतर भागातही वृक्षारोपण व सुशोभीकरण होणे गरजेचे आहे असे मत मुख्याधिकारी किरण राजयादव यांनी व्यक्त केले.

 

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचे सदस्य व मंगेशनाना ओमासे मित्र परिवाराचे मंगेश ओमासे यांनी मुख्याधिकारी किरणराज यादव यांची भेट घेतली. सायली परिसरात एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून झालेल्या वृक्षारोपण व सुशोभीकरणाची माहिती दिली. परिसरात पर्यावरणाच्या दृष्टीने पक्षी प्राण्यांची माहिती असलेले फलक लावल्याचे ओमासे यांनी सांगितले.

 

वृक्षांना सध्या पाण्याची गरज असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे, याबाबतचे निवेदन त्यांनी दिले. त्यानंतर तत्परता दाखवत मुख्याधिकारी यांनी अवघ्या दहा मिनिटांत पाण्याच्या टॅंकरची सोय केली. पुढील काळात परिसरात झाडांना टॅंकरने कायमस्वरूपी पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्‍वासन मुख्याधिकारी यांनी दिले. मंगेश नाना ओमासे मित्र परिवाराच्या इतर कार्याविषयी त्यांनी माहिती घेतली. सायली हिल परिसरातील झालेल्या कामकाजाची पाहणी करण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

 

  • अजितदादांचा हरित वारसा जपला
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वृक्षांविषयीचे प्रेम सर्वांना परिचित आहे. त्यामुळे विकासाचा पॅटर्न म्हणून ओळख असलेल्या बारामतीची हरित बारामती अशीदेखील ओळख निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी अजित पवार यांचे हरित बारामतीचे स्वप्न साकार करण्यासाठी कार्यरत असलेले दिसून येत आहेत. मंगेश नाना मित्र परिवाराच्या वतीने सायली हिल येथे राबविण्यात आलेल्या उपक्रमवरून त्याची प्रचिती येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.