तालिबानने मृतदेह भर चौकात लटकावला

काबूल – तालिबानने एका व्यक्तीचा मृतदेह हेरात प्रांतातील एका शहरात भर चौकात लटकावला. एका क्रेनच्या सहाय्याने हा मृतदेह भर चौकात लटकावण्यात आला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दहशत निर्माण करण्यासाठी तालिबानच्यावतीने पूर्वी अशा प्रकारची अघोरी कृत्ये केली जात असत. त्याची आता पुनरावृत्ती केली जाऊ लागल्याचे आता स्पष्ट होत आहे.

तालिबान्यांनी चार मृतदेह चौकात आणले होते. त्यापैकी एक मृतदेह चौकात लटकावण्यात आला. तर उर्वरित 3 मृतदेह अन्य चौकात लटकावण्यासाठी नेण्यात आले, असे वझीर अहमद सिद्दीकी या स्थानिक औषध विक्रेत्याने सांगितले.

हे चौघेही अपहरणामध्ये सहभागी होते आणि पोलिसांद्वारे मारले गेले असल्याचे तालिबान्यांनी यावेळी भर चौकात जाहीर केले. मात्र या चौघांचा मृत्यू पोलिसांबरोबरच्या चकमकीत झाला की अटकेनंतर त्यांना ठार मारण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात तालिबानकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

इस्लामिक कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे आणि तालिबानी राजवटीत पुन्हा एकदा कठोर शिक्षा दिल्या जाणार आहेत, असे तालिबानचा एक संस्थापक मुल्ला नरुद्दीन तौरबी याने गेल्या आठवड्यातच म्हटले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.