मुंबई : सोमवारी भारतीय शेअर बाजाराला धक्का बसला. सोमवारी, बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 1,550 अंकांपेक्षा अधिक घसरला, तर निफ्टी 450 हून अधिक अंकांनी घसरला. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) सतत विक्री, यूएस फेडरल रिझर्व्ह (US Fed) कडून आक्रमक दरवाढीची भीती आणि कमजोर रुपया यामुळे गुंतवणूकदारांच्या सेंटीमेंट्स खराब झाल्या आहेत. याशिवाय वाढत्या महागाईनेही चिंता वाढवली आहे.अमेरिकेतील महागाईने मे महिन्यात 40 वर्षांच्या उच्चांकी 8.6 टक्क्यांवर मजल मारली आहे, तर मे महिन्यात भारताचा CPI 7 टक्क्यांपेक्षा जास्त असण्याची अपेक्षा आहे. या सर्व घटकांचा बाजारावर परिणाम झाला आहे. जाणून घेऊया शेअर बाजारातील घसरणीची ५ मुख्य कारणे…
1. अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर
अमेरिकेतील महागाई मे महिन्यात 40 वर्षांच्या उच्चांकी 8.6 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. शुक्रवार, 10 जून रोजी विक्रमी चलनवाढीमुळे अमेरिकन शेअर बाजारात विक्री वाढली. यामुळे सोमवार, 13 जून रोजी यूएस इक्विटी फ्युचर्समध्ये घसरण झाली. या ग्राहक किंमत डेटासह, यूएस फेड महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलेल.
२)व्याज दरात वाढ
अमेरिकेतील महागाईत विक्रमी वाढ झाल्यानंतर अमेरिकन फेडकडून व्याजदरात आक्रमक वाढ होण्याची शक्यता बळकट झाली आहे. यूएस फेडरल रिझर्व्हची दोन दिवसीय बैठक १५ जूनपासून सुरू होणार आहे. रॉयटर्सच्या मते, यूएस फेड जून आणि जुलैमध्ये मुख्य व्याजदर 50 बेस पॉइंट्सने वाढवू शकते. दर वाढीच्या भीतीने, यूएस 10-वर्षांच्या ट्रेझरी उत्पन्नाने 3 टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. यूएस 10-वर्षीय ट्रेझरी उत्पन्न तीन वर्षांत प्रथमच या पातळीवर पोहोचले आहे.
३) कच्चा तेलाच्या किंमतीतील अस्थिरता
कच्च्या तेलाच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. अमेरिकेतील विक्रमी चलनवाढ आणि चीनमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे आणखी लॉकडाऊन होण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणुकदारांनी यूएस फेडने आक्रमक भूमिका घेतल्याने कच्चे तेल नरमले आहे. ब्रेंट क्रूड आणि डब्ल्यूटीआय क्रूड व्यापारात 1.4 टक्क्यांनी घसरून अनुक्रमे 120 डॉलर प्रति बॅरल आणि 118 डॉलर प्रति बॅरल झाले.
४) भारतातील महागाई
मे महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी आज संध्याकाळी जाहीर होणार आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, इकॉनॉमिस्टचा अंदाज आहे की मे महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) 7.10 टक्क्यांपर्यंत घसरेल. एप्रिलमध्ये तो 7.7 टक्के होता. त्यांचा अंदाज आहे की मे सीपीआय 6.7 टक्के ते 8.3 टक्के या श्रेणीत असू शकते.
५)रुपाया विक्रमी नीचांकीवर
सोमवारी भारतीय रुपया प्रति डॉलर 78.16 या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरची मजबूती, यूएस फेडकडून व्याजदरात वाढ करण्याची चिंता आणि कच्च्या तेलातील अस्थिरता यामुळे सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 78 चा टप्पा पार केला. याशिवाय जूनमध्ये भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात 30.6 कोटी रुपयांची घट झाली आहे.