पुणे – यंदाच्या वर्षापासून राज्य सरकाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या 12 दिग्गजांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देत सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारांमध्ये मराठी नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचा समावेश असतो. यंदा नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना देण्यात येणारा पुरस्कार या वर्षापासून “नटसम्राट डॉ. श्रीराम लागू’ यांच्या नावाने देण्यात असल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.
कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या “नटसम्राट’ या नाटकात त्यांनी “अप्पासाहेब बेलवलकर’ ही प्रमुख भूमिका साकारली आणि ती अजरामर केली. त्यातील संवाद फेक ही रसिकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत अशी ख्याती असणाऱ्या डॉ. लागूंनी अनेक मराठी, हिंदीसह विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले. 17 डिसेंबर रोजी वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे चित्रपट, नाटके आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.