मंचर- आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे सर्व्हिसिंगसाठी आणलेल्या दुचाकीच्या डिक्कीत साप निघाल्याने सर्व्हिसिंग करणाऱ्यांची धांदल उडाली. सर्पमित्राने सापाला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे.
लॉकडाऊन काळात अनेक दिवसांपासून घरात ठेवलेली दुचाकी एका नागरिकाने मंचर येथील एका आटो सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व्हिसिंगसाठी नेली होती. सुशांत शिंदे, रोहित शिंदे हे गाडी खोलत असताना गाडीच्या डिक्कीत मण्यार जातीचा साप मिळून आला.
क्कीत अचानकपणे साप दिसल्याने गाडी मालक आणि सर्व्हिसिंगवाल्यांची धांदल उडाली. त्यांनी ताबडतोब गावातील सर्पमित्रांना बोलावले. या सर्पमित्राने सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले. लॉकडाउनच्या काळात अनेक नागरिकांनी वाहने एकाच ठिकाणी लावली होती, तसेच दरम्यानच्या काळात झालेल्या चक्रीवादळामुळे आणि पावसामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांनी सुरक्षिततेसाठी गाड्यांचा आश्रय घेतल्याचे या घटनेवरून दिसत आहे.