चार कर्मचारी जखमी
कराड: येथील मार्केट यार्ड गेट क्रमांक तीनच्या कराड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने बनवण्यात येणाऱ्या स्वागत कमानिचा स्लॅब कोसळला. ही घटना बुधवारी दुपारी 2:30 वाजता घडली. यामध्ये चार कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीचे बांधकाम सुरू असून ते काम अंतिम टप्प्यात आले होते. मात्र बुधवारी दुपारी 2.30 सुमारास या कमानीचा स्लॅब अचानकपणे कोसळला. यामध्ये सुमारे चार कर्मचारी जखमी झाली आहे.