पोलिसांच्या मुजोरपणाचे उत्तर प्रदेशात दर्शन
इटवाह ( उत्तर प्रदेश) : सुधारीत नागरीकत्व कायद्याला (का) विरोध करण्यासाठी निदर्शने करणाऱ्या महिलेला पोलिसांनी पाठलाग करत काठीने बेदम झोडपल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे उत्तर पोलिसांच्या मुजोरपणावर प्रकाशझोत पडला आहे.
पोलिस महिलेचा पाठलाग करत आहेत. तिला काठीने झोडपत आहेत आणि दुकानात कोंडत असल्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहेत. 17 सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपमुळे एक महिला किंचाळत आहे, मला का मारत आहात असे विचारत आहे. त्या भागात जमा झालेल्या नागरिकांवरही पोलिस लाठीमार करत असल्याचे या क्लिपमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाचहारा भागतील आहे.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एका उपहारगृहात शिरून कर्मचाऱ्यांना तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिविगाळ करताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असणऱ्या विक्रेत्याना हुसकावून दुकाने बंद करायला लावताना दिसत आहेत.
हाती आलेल्या वृत्तानुसार, पाचहारा भागात सकाळी सुमारे 150 महिलांनी निदर्शने सुरू केली. सायंकाळपर्यंत निदर्शकांची संख्या 500पर्यमत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना मारहाण करून पांगवण्यास सुरवात केली. दरम्यान, निदर्शकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे ट्विट पोलिसांनी केले आहे.
दरम्यान पोलिसांनी एक डझन निदर्शकांवर गुन्हा दाखल केला आहे.