कैरो – सुदानच्या सुआकिनच्या लाल समुद्रातील बंदरावर रविवारी हजारो मेंढ्यांसह भरलेले एक जहाज बुडाले. या दुर्दैवी घटनेत जहाजातील सर्व मेंढ्या बुडाल्या, पण सुदैवाने जहाजावरील सर्व क्रू मेंबर वाचले आहेत. पशुधन असलेले जहाज बुडाले तेव्हा ते सुदानमधून सौदी अरेबियाला निर्यात करत होते.
राष्ट्रीय निर्यातदार संघटनेचे प्रमुख ओमर अल-खलिफा यांनी सांगितले की, जहाजाला बुडण्यासाठी बराच वेळ लागला होता. त्यामुळे काही मेंढ्यांचा जीव वाचवता आला असता. जीव गमावलेल्या पशुधनाची एकूण किंमत सुमारे 34 मिलीयन डॉलर होती, असे संघटनेच्या पशुधन विभागाचे प्रमुख सालेह सेलीम यांनी सांगितले. ज्यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, जहाजावरील सर्व क्रू मेंबर वाचवण्यात आले आहेत. त्यांनी अपघाताच्या आर्थिक आणि पर्यावरणीय परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. बुडालेल्या जहाजाचा बंदराच्या कामकाजावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.