मुंबई – अमेझॉन प्राइम व्हिडिओने आगामी सिरीज ’जुबली’च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. 10 भागांची फिक्शनल ड्रामा असलेल्या या सिरीजचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे तर, याची निर्मिती सौमिक सेन आणि मोटवानी यांनी केली आहे. भारत आणि चित्रपट या दोन्हींच्या विकासाशी समांतर, ’जुबली’ अशा कथा आणि स्वप्नांचा खुलासा करते ज्यांनी हिंदी चित्रपट उद्योगाला जन्म दिला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर आधारित, ’जुबली’ रोमांचक आणि काव्यात्मक कथा आहे
या सिरीजमध्ये प्रसेनजीत चॅटर्जी, अदिती राव हैदरी, अपारशक्ती खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदिश संधू आणि राम कपूर अशी हटके स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. ही सर्व पात्रे वेगवेगळ्या कथा सांगणार असली तरी एकमेकांत गुंतलेली असणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विक्रमादित्य मोटवानी यांच्या या सिरींजची चांगलीच चर्चा होती.
View this post on Instagram
7 एप्रिल रोजी ’जुबली’चा ग्लोबल प्रीमियर पार पडणार असून याच दिवशी स्ट्रीमिंग सुरु होणार आहे.निर्माता आणि दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी म्हणाले, “’जुबली’ही एक अतिशय उत्कृष्ट कथा आहे जी प्रत्येक माणसाबद्दल काहीतरी बोलते. यामुळेच मी कथेकडे प्रथम आकर्षित झालो.आम्ही सिरीजमधील प्रत्येक पैलूवर कठोर परिश्रम घेतले आहेत” लवकरच ही सिरीज प्रदर्शित होईल.