Reliance Jio Cheapest Plan : Amazon Prime चे सब्स्क्रिप्शन घेण्यासाठी दर महिन्याला पैसे खर्च करत असाल तर आता तुमचे पैसे वाचणार आहे. कारण जिओच्या या वर्षभराच्या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राईम अगदी फ्री मिळणार आहे ते ही संपूर्ण वर्षभरासाठी. आम्ही ज्या रिलायन्स जिओ प्लॅनबद्दल बोलत आहोत तो 3227 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना अनेक फायदे मिळतात. तुम्ही तुमचा जिओ नंबरवर 3227 रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर ३६५ दिवस मोफत कॉल करू शकता. या प्लॅनचा एक मोठा फायदा असा आहे की यामध्ये तुम्ही एकाच वेळी संपूर्ण वर्षभर रिचार्जच्या त्रासापासून मुक्त व्हाल.
जिओ आपल्या वापरकर्त्यांना भरपूर डेटा देखील प्रदान करते. या वार्षिक प्लॅनमध्ये, कंपनी युजर्सना तब्बल 730GB डेटा प्रदान करते, म्हणजेच तुम्ही दररोज 2GB डेटा वापरू शकता. यासोबतच तुम्हाला दररोज शंभर एसएमएस देखील दिले जातात. तुमचा इंटरनेट डेटा संपला तर तुम्ही मेसेजद्वारे चॅट करू शकता.
Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन
जर तुम्ही Amazon प्राइमचे पेड सबस्क्रिप्शन प्लॅन पुन्हा पुन्हा खरेदी करून थकला असाल तर तुम्हाला हा प्लान खूप आवडेल. 3227 रुपयांच्या या प्लॅनमध्ये Jio ग्राहकांना वर्षभरासाठी प्राइम व्हिडिओचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.हे प्राइम व्हिडिओचे सब्स्क्रिप्शन केवळ मोबाइल सबस्क्रिप्शन असणार आहे यांची नोंद घ्यावी.
Amazon Prime Video व्यतिरिक्त, युजर्सना इतर अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. या प्लानमध्ये कंपनी यूजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. अशाप्रकारे, तुम्ही एकाच प्लॅनमध्ये अनेक मोफत कॉलिंग तसेच मोफत OTT स्ट्रीमिंगचा लाभ घेऊ शकता.