बॉलिवूडच्या सुवर्णकाळातील म्हणजेच ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ‘मुमताज’ यांची प्रकृती सुखरुप आहे. खुद्द मुमताज यांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. मुमताज यांचं निधन झाल्याच्या काही अफवा सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून फिरत होत्या. मात्र, आता खुद्द मुमताज यांनीच या अफवांचा पडदा फाश केला असून, मी पूर्णपणे धडधाकट असल्याचं सांगितलं आहे. मुमताज सध्या लंडनमध्ये स्थायिक आहे.
मुमताज यांनी वयाच्या 11 व्या वर्षी म्हणजेच 1958 मध्ये ‘सोने की चिडिया’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून सुरुवात केली. मात्र ‘गेहरा दाग’ (1963) हा त्यांचा पहिला चित्रपट मानला जातो. ‘ये रेशमी जुल्फे, बिंदिया चमकेगी, सुन चम्पा यासारखी अनेक सुपरहिट गाणी मुमताज यांच्यावर चित्रित झाली आहेत.
https://www.instagram.com/p/BiJtnmfhUhv/?utm_source=ig_web_copy_link
Extremely sorry for posting news about Mumtaz ji’s demise. By God’s grace, she is hale and hearty. The incorrect news is gaining ground in the film trade. But to set the record straight, Mumtaz ji is absolutely fine.
— Komal Nahta (@KomalNahta) May 3, 2019