बावडा – बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीत आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार न देता तटस्थ भूमिकेत राहणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष शरद चितारे यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील बावडा- लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रत्नप्रभा देवी पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी होत असलेल्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी तटस्थ राहणार असून उमेदवार उभा करणार नाही. आमचा कुणालाही पाठिंबा नसेल, असे यावेळी चितारे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बावडा- लाखेवाडीची पोटनिवडणुकीत वंचितने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गटात चर्चा सुरू झाली आहे.