निमोणेजवळ अपघातात दोघांचा मृत्यू

 बसची दोन दुचाकींना धडक ः अन्य दोघे जखमी
निमोणे  – निमोणे-गुनाट रस्त्यावर शनिवारी (दि. 8) रात्री 11 वाजता खासगी बसने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू णाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सुभाष नारायण जाधव यांनी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. आकाश बंडू मोहिते (रा. इनामगाव, ता. शिरूर) व अशोक मातकर (पूर्ण नाव व पत्ता समजू शकला नाही) अशी मृत्युमुखी पडलेल्याचीं नाव आहेत. तर शंकर उदमले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) व आणखी एक जण (नाव कळू शकले नाही) यांना गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आकाश मोहिते व शंकर उदमले हे दोघे त्यांच्याजवळील मोटारसायकलवरून (एमएच 12 एलबी 4966) इनामगाव ते निमोणे असे जात असताना ट्रॅव्हलर बसने (एमएच 12 के क्‍यू 6099) त्यांच्या मोटरसायकलला समोरून धडक दिली. तसेच आणखी एका स्कूटी मोपेडलाही (एम एच 12 पी व्ही 2734) धडक दिली. या धडकेत स्प्लेंडरवरील आकाश मोहिते व स्कूटीवरील अशोक मातकर हे गंभर जखमी झाले व अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर शंकर उदमले व अन्य एकजण हे जखमी झाले. उपचाराकामी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.