लंडन – “डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले की, विकसनशील देशांमध्ये जसजसा करोनाचा प्रकोप वाढत चालला आहे, तसतसे प्रसुतीवेळी होणाऱ्या मृत्यूचा धोका वाढत आहे.
महासचिव तेद्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले की, डब्ल्यूएचओला अशा लोकांची चिंता आहे, ज्यांना आरोग्य सुविधांपर्यंत पोहोचायला बरीच कसरत करावी लागते, जसे महिला आणि लहान मुले.
करोना जागतिक महामारीने अनेक देशांच्या आरोग्य सुविधांवर ताण आलेला आहे. सर्वाधिक रुग्णालये करोनाबाधितांसाठीच काम करीत आहेत. तेथेच वैद्यकीय मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर अडकलेले आहे. त्यामुळे प्रसुतीदरम्यान महिलांचा मृत्यू होण्याचा धोका अधिक वाढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच मातांमुळे त्यांच्या नवजात शिशूंना होणाऱ्या करोना संसर्गाच्या धोक्याचे परीक्षण केले. यात सकारात्मक बाब आढळून आली आहे की, स्तनपानामुळे विषाणू प्रसाराच्या धोक्याला दूर ठेवता येते.