नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या साथीने भले भारतात केलेला शिरकाव रोखण्यात आपण यशस्वी ठरलो असलो तरी या साथीने आपल्या अब्जोपती उद्योगपतींची झोप उडवली आहे. काही अब्ज रुपयांचे नुकसान या साथीमुळे भारतीय उद्योगपतींना सोसावे लागत आहे.
याबाबतचे वृत इकॉनॉमिक्स टाईम्सने प्रकाशित केले आहे. भारत आणि आशियातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर पाच अब्ज अमेरिकन डॉलर्सचे नुकसान सोसावे लागले आहे. आदित्य बिर्ला समुहाच्या कुमार मंगलम बिर्ला यांना 88 कोटी 40 लाख अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला आहे.
ब्लूमबर्ग अब्जोपतींच्या यादी प्रमाणे आझिझ प्रेमजी यांच्या संपत्तीला 86 कोटी 90लाख अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला आहे तर अदानी समुहाच्या गौतम अदानी यांच्या संपत्तीत 49 कोटी 60 लाख अमेरिकन डॉलर्सने घट झाली आहे.