#IPL2021 : राईट टू मॅच कार्ड निर्णायक ठरेल

आयपीएल 2021 स्पर्धेचा लिलाव

नवी दिल्ली   – आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमासाठी सहभागी होत असलेल्या सर्वच संघांसाठी राईट टू मॅड कार्च निर्णायक ठरणार आहे. या स्पर्धेसाठीच्या लिलाव प्रक्रियेच्या वेळापत्रकाची लवकरच घोषणा होणार असून त्यात आपल्या पसंतीच्या खेळाडूंना आपल्या संघात कायम राखण्यासाठी हे कार्ड ट्रम्पकार्ड ठरणार आहे. 

पुढील स्पर्धेसाठीचा लिलाव जवळपास सर्व संघांसाठी नवे व अव्वल खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. यंदाची स्पर्धा लिलाव प्रक्रिया न होता घेण्यात आली. करोनाचा धोका जगभरात असल्याने बीसीसीआय व आयपीएल समितीने लिलाव करण्याऐवजी सर्व संघांना गेल्या वर्षीच्याच संघासह स्पर्धेत खेळण्याचे आवाहन केले होते. आता करोनाचा धोका आखातात कमी असल्याने अमिरातीतच ही स्पर्धा पूर्णपणे खेळवण्यात आली.

आयपीएलच्या लिलावापूर्वी प्रत्येक संघ तीन खेळाडू संघात कायम ठेवू शकतात. मात्र, अन्य खेळाडूंना कायम राखणे अशक्‍य ठरत आहे. अशा स्थितीत संघातील एखादा खेळाडू बाहेर जाऊ नये यासाठी या राईट टू मॅच कार्डचा वापर करावा लागतो. या राइट टू मॅच कार्डनुसार प्रत्येक संघाला आपल्या पसंतीच्या किमान दोन खेळाडूंना संघात कायम ठेवता येऊ शकते. जर एखाद्या संघाने एकाही खेळाडूला संघात कायम ठेवले नसेल तर त्यांना पाच खेळाडूंना राइट टू मॅच कार्डनुसार आपल्याच संघात ठेवता येते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.