पुणे – जर्मन बेकरी प्रकरणातील संशयित यासीन भटकळ याला सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगऐवजी प्रत्यक्ष हजर करावे, यासाठी बचाव पक्षाने अर्ज केला आहे. यावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, ती आता 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. विशेष न्यायाधीश आर.एम. पांडे न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
शुक्रवारी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे आणि बचाव पक्षाचे वकील जहीरखान पठाण हजर झाले. हिमायत बेग खटल्यातील काही कागदपत्रे मिळावेत, यासाठीही बचाव पक्षाने अर्ज केला आहे. यासह आणि भटकळला हजर करण्याच्या अर्जावर पुढील तारखेला सुनावणी होणार आहे.