सलमान खान आपला आगामी “राधे’ हा चित्रपट 2020मध्ये ईदला रिलीज करू इच्छित होता. पण हा चित्रपट पूर्ण होऊ न शकल्याने सलमान खानच्या चित्रपटाशिवाय चाहत्यांना ईद साजरी करावी लागली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले असून ते अंतिम टप्प्यात आहे. हा चित्रपट या वर्षाअखेर रिलीजसाठी सज्ज होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
देशभरातील काही राज्यांमध्ये चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी काही राज्यांमध्ये अद्यापही बंदी आहे. तसेच सरकारने कठोर गाईडलाइन आखून दिल्या आहेत. यामुळे अद्यापही बिग बजेट चित्रपट रिलीज होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, सलमान खानबाबत सांगायचे झाल्यास त्याला “राधे’ चित्रपट रिलीज करण्याची घाई असल्याचे दिसत नाही. हा एक बिग बजेट चित्रपट असल्याने सर्वसामान्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.
रिलीज डेटबाबत सांगायचे झाल्यास तो पुढील वर्षी ईदला रिलीज करण्याचे नियोजन आहे. ईदला आणखी बराच काळ असल्याने परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. यामुळे “राधे’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.