करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर थिएटर बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेक सिनेमे रिलीज करण्याच्या तारखा बदलल्या जात आहेत. यशराज फिल्म्स आणि एक्सेल एन्टरटेनमेंटनेही आपल्या आगामी सिनेमांच्या रिलीज डेट बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
रणवीर सिंहचा लीड रोल असलेला जयेशभाई जोरदार आणि फरहान अख्तरचा तुफान हे दोन्ही आता पुढे ढकलले गेले आहेत. जयेशभाई… आता याच वर्षी 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. तर तुफान 18 सप्टेंबरला थिएटरमध्ये झळकणार आहे. यशराज फिल्म्सने याबाबतची अधिकृत घोषणा ट्विटरवर केली आहे.
या बदलामुळे आता जयेशभाई… आणि जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. तर परिणिती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांचे लीड रोल असलेला संदीप और पिंकी फरार हा देखील आता पुढे ढकलला गेला आहे.
हा सिनेमा 20 मार्चला रिलीज होणार होता. त्याची रिलीज डेट बदलण्यात आल्याचे परिणिती आणि यशराज फिल्म्सने ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र पुढील रिलीज डेट स्पष्ट केले गेलेले नाही. पण लवकरच ही बदललेली रिलीज डेट जाहीर केली जाईल.