जॅकसन (अमेरिका) – अमेरिकेतील मिसिसीपी प्रांताने आपल्या प्रांताच्या ध्वजामध्ये बदल करण्याच्या निर्णयाला राज्याच्या विधानसभेची मंजुरी मिळाली. संघराज्याविरोधातील आपले पहिले पाऊल म्हणून मिसिसीपीच्या लोकप्रतिनिधींनी या निर्णयाकडे बघितले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून संघराज्याच्या प्रतिकाला राज्याच्या ध्वजावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली जाऊ लागली होती.
कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांच्या विरोधात देशव्याप्ती आंदोलनही छेडले गेले आहे. त्याचेच पर्यावसन प्रांताच्या ध्वजामध्ये बदल करण्याच्या मागणीमध्ये झाला होता. मिसिसीपी प्रांताच्या विधानसभेमध्ये ध्वजातील बदलासंबंधीचे विधेयक दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाले.
सभागृहातील सदस्यांनी हे विधेयक मंजूर करण्याची मुदत स्थगित करण्याच्या ठरावालाही मंजूर केले. त्यामुळे या ध्वजाविरोधातील विधेयक मंजूर करून घेण्यास अधिक अवधी मिळाला. त्यानंतर सिनेटमध्ये ध्वज बदलासंबंधीचे विधेयक मंजूर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिपब्लिकन सदस्यांचे बहुमत असलेल्या प्रांताच्या सिनेटमध्ये ध्वजासंबंधीचे विधेयक मंजूर होण्यास कोणतीही अडचण नाही. जर रिपब्लिकन सदस्यांनी विधेयक मांडले तर आपण ते मंजूर करू, असे गव्हर्नर टेट रीव्हज यांनी सांगितले.
विधानसभेत नवीन राज्याचा ध्वजाबाबतचे विधेयक गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे, असे रीव्हज यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. आता ध्वजबदलाचे विधेयक केवळ साध्या बहुमताने मंजूर होणे आवश्यक आहे.
मिसिसीपीचा ध्वज 1894 साली बनवलेला आहे. हा ध्वज विभाजनवादी असल्याचे मानले जात होते. संघराज्याबरोबरच्या संघर्षाचे प्रतिक नसलेल्या नवीन ध्वजाच्या रचनेसाठी आता एका आयोगाची नियुक्ती केली जाईल. नवीन ध्वजासाठी 3 नोव्हेंबरला मतदान घेतले जाईल. त्याच दिवशी नवीन ध्वज निवडला जाऊ शकतो.