Maharashtra – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. छगन भुजबळ म्हणाले, ‘शरद पवारांनी राजीनामा द्यायचा. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांना पक्षाचं अध्यक्षपदी नेमायचं आणि मग राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जायचं. त्यामुळेच त्यांनी अचानक राजीनामा दिला. शरद पवार राजीनामा देणार आहेत याची मलाही कल्पना नव्हती.” असा खुलासा भुजबळ यांनी केल्या नंतर आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाल्या,’शरद पवार मला राष्ट्रवादीचे अध्यक्ष करणार होते. तसा प्रस्ताव होता. परंतु, ही गोष्ट मला स्वतःला अस्वस्थ करणारी होती. कारण त्यात तीन गोष्टी होणार होत्या. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार यांची भाजपाबरोबर जाण्याची इच्छा नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं शरद पवार सगळ्यांना म्हणाले होते, आणि स्वतः काल भुजबळ यांनीदेखील त्याची कबुली दिली आहे.’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
त्या पुढे म्हणाल्या,’शरद पवार गटातील नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, एका बाजूला सत्ता होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष होता. मी सत्तेपेक्षा संघर्षाचा निर्णय घेतला. छगन भुजबळ बोलले ते खरं आहे, मला अध्यक्ष करणार होते. परंतु, मी माझ्या विचारधारेवर ठाम राहिले.’ असं म्हणत त्यांनी भुजबळांवर पलटवार केला.