मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती. यानिमित्त शिवसैनिकांकडून मुंबईसह राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ देखील आज समाप्त होणार आहे. शिवाय ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. अशात दोन्हही गटांकडून आज बाळासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सेवनात यांनी केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. बाळासाहेबांचे स्मरण करत सावंत यांनी शिंदे गटासह भाजपवर निशाणा साधला आहे.
“वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन…!” अशा आशयाने सावंत यांनी आपली ही पोस्ट सुरु केली आहे. पोस्टमध्ये ते पुढे म्हणतात,”करण्या अवतार कार्य चंद्र सूर्य ताऱ्यांनो, वादळी वाऱ्यांनो,महाराष्ट्राभिमानी राष्ट्राभिमानी सैनिकांनो व्हा प्रतिबद्द , घ्या शपथ !
“छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना अवमानीत करणाऱ्यांना,डॉ. बाबासाहेबांच्या संविधांनावर हल्ले करणाऱ्या मतीभ्रष्टांना,शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दारांना,राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या एकतेला सुरूंग लावणाऱ्यांना,प्रबोधनकार आणि वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंच्या विचार, आचारांचा खरा वारसा जपण्या,मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता आणि स्वाभिमान जपण्या,राष्ट्रधर्म सोडून जातीपाती, प्रांती, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या या राष्ट्र आणि महाराष्ट्रद्रोह्यांना नेस्तनाबूत करण्या,उचला बेल भंडार ! म्हणा, उदो उदो ग अंबाबाई.. साहेब हीच आमची आपणास ग्वाही…!” असं म्हणत सावंतांनी भाजपसह शिंदे गटावर नाव न घेता निशाणा साधला आहे.