कराचीत भरवस्तीत विमान कोसळले…

107 जण दगावल्याची भीती, अनेक घरे पेटली

कराची : येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणारे ए-320 विमान येथील रहिवाशी भागात कोसळले. यामुळे तेथे अनेक घरांना आग लागली. या विमानात कर्मचाऱ्यांसह 107 प्रवाशी होते. हे विमान लाहोरहून कराचीला येत होते. मॉडेल कॉलनी भागाजवळील जीना बाग येथे विमानतळापासून चार किमी अंतरावर हे कोसळले. त्यात 100 प्रवासी आणि सात कर्मचारी होते, अशी माहिती पाकिस्तानच्या नागरी हवाई उड्डाण संचनालयाने दिली.

हे विमान कोसळलेल्या ठिकाणी धुराचे लोट उठलेले दिसत होते. हे विमान कोसळण्याआधी एक मिनिट या विमानाशी संपर्क झाला होता. या अपघातात अनेक अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

पाकिस्तानच्या लष्कराचे जलद प्रतिसाद दल घटनास्थळावर ताडीने पोहोचले असून मदत कार्य सुरू करण्यात आले अहे. कराचीतील सर्व रुग्णालयात आणीबाणीचा इशारा देण्यात आला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×