Ajay Purkar On Bastar Film| अभिनेत्री अदा शर्माचा ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केलेला ‘बस्तर’ हा चित्रपट पाहिल्यानंतर मराठमोळे अभिनेते अजय पूरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजय यांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत अजय पुरकर सांगतात की, “काल ‘बस्तर: द नॅक्सल स्टोरी’ नावाचा झंझावात बघितला. अदा शर्मा आणि इंदिरा तिवारी या मुलींनी जबरदस्त काम केलं. सुदिप्तो सेन यांनी ‘द केरला स्टोरी’ नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर कमाल सादर केली आहे. निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी चित्रपटाची मांडणी खूप उत्तमरित्या केली आहे. संपूर्ण भारतीयांनी हा चित्रपट बघा आणि तुमच्या मुलांनाही हा चित्रपट दाखवा. देशात आतून जी कीड लागलीय, जी वाळवी लागलीय, ती वाळवी संपूर्ण देश पोखरत आहे, त्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश या चित्रपटातून करण्यात आला आहे.” Ajay Purkar On Bastar Film|
View this post on Instagram
अजय पूरकर पुढे म्हणतात, “आपल्या आजूबाजूला असलेल्या शाळा-कॉलेजमध्ये जी लोकं आहेत.. आपण काम करतो त्या इंडस्ट्रीत अशी लोकं आहेत या सगळ्यापांसून सावध राहा. तुमच्या मुलांनाही सावध राहायला सांगा. हा देश संपवतील ही लोकं. या लोकांना ‘बस्तर – द नक्सल स्टोरी’ सिनेमाने सणसणीत कानफडात मारली आहे.” असं परखड मत व्यक्त करुन अजय पूरकर यांनी ‘बस्तर’ सिनेमा पाहण्याचं आवाहन सर्वांना केला. या व्हिडीओतून अजय यांनी बस्तर पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे. Ajay Purkar On Bastar Film|
दरम्यान, ‘बस्तर द नक्सल स्टोरी’मध्ये अदा शर्मा आयपीएस नीरजा माधवनची भूमिका साकारताना दिसणार आहे. सनशाईन पिक्चर्सच्या बॅनरखाली अशिन ए. शाह यांची सहनिर्मिती असलेला हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा:
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडे लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एन्ट्री