मुंबई – 90 च्या दशक महाभारत मालिका चांगली गाजवली.या मालिकेतील प्रत्येक पात्राची भूमिका साकारणारे कलाकारा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. असे असले तरी यातील भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार हे सध्या आजारपणात आहेत.
प्रवीण कुमार यांची याच मालिकेत भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार हे सध्या आजारपणात आहेत. आजारपणात असताना सध्या त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत असे त्यांनी सांगितले आहे.
त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या आर्थिक स्थितीबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘माझं वय ७६ वर्ष असून गेल्या काही काळापासून घरात आहे. माझी तब्येत ठीक नाही. खाण्यात सुद्धा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मणक्यांचा त्रास आहे. या आजार पणामुळे मला सरकारने आर्थिक मदत करावी. त्यामुळे त्यांनी सरकारकडून पेन्शनची मागणी केली आहे.