“फ्री बेड’च्या लाभापासून रुग्ण वंचित

अनेक बड्या रुग्णालयांकडून कराराचे उल्लंघन : पालिकेचे दुर्लक्ष

अपुऱ्या माहितीचा अहवाल…
रुग्णालयांनी किती “फ्री बेड’ फॅसिलिटी दिली याचा अहवाल आरोग्य विभागाने स्थायी समितीला देणे बंधनकारक आहे. मात्र, ती माहिती दिली जात नसल्याचेही दिसून आले आहे. ही माहिती आठवड्याला देणे बंधनकारक आहे. मात्र, ती दिली जात नाही. जी तयार केली जाते तीही अपुऱ्या माहितीच्या आधारे केली जाते.

पुणे  – महापालिकेशी करार केलेल्या बड्या खासगी रुग्णालयांमध्ये “फ्री बेड’ ठेवतच नसल्याचे पालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक बड्या रुग्णालयांचे महापालिकेशी “फ्री बेड’बाबत करार झाले आहेत. मात्र, त्यातुलनेत रुग्णालय सेवा देत नसल्याचे पालिकेनेच दिलेल्या आकडेवारीवरून सिद्ध होते. परंतु, त्याबाबत कोणतीही कारवाई या रुग्णालयांवर होत नाही. महापालिकेकडून या रुग्णालयांना “फ्री एफएसआय’ देण्यात आला आहे. याशिवाय त्यांना विकसन शुल्कही माफ केले आहे. पाणीपट्टी वगैरेंमध्येही सवलत देण्यात आली आहे. असे असतानाही या रुग्णालयांचा वापर महापालिकेला नागरिकांसाठी करता येत नसल्याचे यातून सिद्ध झाले आहे.

काही बड्या रुग्णालयांचे महापालिकेशी करार झाले आहेत. त्यामध्ये रोज 11 बेड उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, या रुग्णालयांनी महापालिकेची फसवणूक करत मोठ्या शिताफीने करारात “री शिी र्रींरळश्ररलळश्रळीूं’ एक वाक्‍य टाकल्याने महापालिकेची कोंडी केली आहे. यामुळे या रुग्णालयांचे फावते आणि करारातील मुद्द्यांवर बोट ठेवले जाते.

“स्वाईन फ्लू’चा जेव्हा मोठ्याप्रमाणात संसर्ग झाला होता. त्यावेळी सर्व खासगी रुग्णालयांना बेडबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, केवळ एका साथीच्या रोगावेळीच “फ्री बेड’ फॅसिलीटी देण्याचा विषय नसून कायमच ही सुविधा उपलब्ध असण्याचा विषय आहे. त्याविषयी मात्र माहिती घेऊन उत्तर देतो.

– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य विभागप्रमुख, महापालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)