पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात 120 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 254 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरात आजपर्यंत 2 लाख 71 हजार 696 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील एका बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4412 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 254 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 11 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6462 जणांची तपासणी करण्यात आली. सद्यस्थितीत रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 562 तर गृह विलगीकरणात 442 असे एकूण 1004 करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.