- डिस्चार्ज अवघ्या 37 रुग्णांना
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज करोनाबाधित रुग्णांची संख्या दोनशेपेक्षा कमी आली आहे. दिवसभरात 161 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आज फक्त 37 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, सोमवारी (दि. 5) शहरात 161 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 59 हजार 154 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 2 करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4295 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 37 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 53 हजार 389 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 5200 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 1167 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 305 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1472 इतकी आहे.