जुन्नर -जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. 25) आलेल्या रिपोर्टनुसार नव्याने 2 करोनाबाधित आल्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची वाढून 372 झाली आहे. त्यांपैकी 139 व्यक्तींवर उपचार सुरू असून 220 जण बरे झाले आहेत.
दरम्यान निमगाव सावा येथील वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या तेरा इतकी झाली आहे. नव्याने वाढ झालेल्या रुग्णांपैकी निमगाव सावा आणि बेल्हे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.